Akshay Shinde | बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर 23 सप्टेंबर रोजी पोलिसांनी केला. या घटनांमध्ये संजय शिंदे या पोलिस अधिकाऱ्याने एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार, अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला करताना, “कुणालाही सोडणार नाही” अशी धमकी दिली.
संजय शिंदे यांच्या एफआयआरमध्ये दिलेला जबाब एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे. त्यांनी उल्लेख केला आहे की, अक्षयने हवालदार महेश तावडे यांच्या दिशेने दोन राऊंड गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना खात्री होती की अक्षय आणखी गोळ्या झाडेल.
Lava Blaze 3 5G भारतात लॉंच; बजेटमध्ये उत्तम, जाणून घ्या किंमत?
संजय शिंदे यांच्या जबाबानुसार, “सोमवारी सकाळी 5:30 वाजता आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अक्षयला ताब्यात घेतले. आम्ही ठाण्याच्या दिशेने निघालो, त्यावेळी मी व्हॅनमध्ये पुढे बसलो होतो, आणि अक्षय, सपोनि निलेश मोरे, व दोन अंमलदार मागे बसले होते.” ते पुढे म्हणाले, “शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आल्यावर, निलेश मोरेने मला फोन केला यावेळी आरोपी अक्षय रागाने ‘तुम्ही मला पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात?’ असे विचारले, तसेच शिवीगाळ केली.”
या प्रकरणाने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चिंता वाढवली आहे. पोलिसांनी ज्या प्रकारे कार्यवाही केली, त्याबाबत चर्चा सुरू आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमुळे कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. संजय शिंदे यांच्या जबाबात दिलेल्या माहितीमुळे याप्रकरणी पुढील तपासाचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.
Salary of Sarpanch । सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय