Alcohol Spray | अबब! ‘या’ जिल्ह्यातील शेतकरी पिकांवर करतात देशी दारूची फवारणी; याचा फायदा होतोय का? जाणून घ्या…

Alcohol Spray Farmers spray native alcohol on crops; Does it help? Find out…

Alcohol Spray | देशात आता शेती करण्याची पद्धत बदलू लागली आहे. शेतीच्या कामांसाठी आता जास्तीत जास्त यंत्रांचा वापर केल्याचे पाहायला मिळत आहे. मनुष्यबळाचा कमी वापर होऊन शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळही वाचत आहे. तसेच शेतकरी आता शेणखत सोडून रासायनिक खते वापरू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना रसायने असणारी फळे, भाज्या खाव्या लागतात आहेत, ज्या आरोग्यासाठी खूप घातक आहेत.

शेतजमिनीवर घर बांधत असाल तर थांबा नाहीतर पाडावे लागले घर; पाहा नियम काय सांगतो

याहून सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शेतकरी आता पिकांवर कीटकनाशकाचा वापर करत नसून दारूचा वापर करत आहेत. वाचून तुम्हालाही धक्का बसला असेलच ना. परंतु हे सत्य आहे. पिकांवर देशी दारूची फवारणी केली तर पिकांचे उत्पादन वाढते असा काही शेतकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे ते दारूची फवारणी करत आहेत.

Success story | शेतकऱ्याचा नादच खुळा! कोथिंबीरतून अवघ्या ४५ दिवसात घेतलं १६ लाखांचं उत्पन्न

आता शेतकरी मूग पिकावर दारूची फवारणी करून उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. असे केल्याने त्यांना जास्त फायदा होईल असा त्यांचा समज आहे. अशा प्रयोगामागे एक वैज्ञानिक तर्क आहे की दारूची फवारणी केली तर त्या वनस्पतींमध्ये उष्णता वाढायला लागते, ज्यामुळे त्यात भरघोस उत्पन्न मिळते.

Pik Vima : ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पिक विम्यासाठी मिळाली मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करू शकताय अर्ज

कृषी शास्त्रज्ञांच्या मतानुसार, अशा प्रयत्नांमुळे त्या पिकावर कोणताही फरक होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून याबाबत कृषी तज्ज्ञ अभिषेक चॅटर्जी यांनी असे सांगितले की, सध्या बाजारात पिकांची वाढ करण्यासाठी अनेक कीटकनाशके उपलब्ध आहेत, त्यांचा वापर शेतकऱ्यांना करता येईल.

Ibrahim Ali Khan | इब्राहिमचा शर्टलेस व्हिडीओ व्हायरल; कमेंट करत नेटकरी म्हणाले, “हा तर खूपच…”

कारण की दारूच्या फवारणीचा पिकावर आतापर्यंत कोणताही परिणाम दिसून आला नाही. खरंतर हा प्रयोग शेतकर्‍यांना मोठ्या संकटात टाकणारा आहे. नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये मुगाचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी दारूची फवारणी करू लागले आहेत.

Seema Haider Case । एक वेळचं जेवणही मिळणं कठीण, सीमा हैदरमुळे वाढल्या सचिनच्या समस्या

Spread the love