मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्यामुळे ते दोघे सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने या आलिया-रणबीर वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये चित्रपटाविषयी तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बोलताना दिसले. आताही एका मुलाखतीमध्ये रणबीरने त्याच्या आणि आलियाच्या खासगी आयुष्याविषयी एक मोठा खुलासा केलाय.
धक्कादायक! भगर खाल्ल्याने १३ जणांना एकाचवेळी विषबाधा; वाचा सविस्तर
एका मुलाखतीमध्ये रणबीरने आलियाच्या एका विचित्र सवयीबद्दल सांगितले, तो म्हणाला “आलियाची झोपण्याची पद्धत खूपच विचित्र आहे. मला बेडच्या एका कोपऱ्यात झोपावं लागत कारण आलीया रात्रभर बेडवर गोल गोल फिरत असते. बेड कितीही मोठा असला तरी मला मात्र कोपऱ्यातच झोपावं लागतं. तिची ही सवय मला रोज सहन करावी लागत आहे”.
Solapur: केळींच्या निर्यातीत सोलापूर जिल्हा आघाडीवर; उसापेक्षा जास्त उत्पन्न
या मुलाखतीत आलियाने देखील रणबीरच्या एका सवयीबद्दल सांगितलं जी तिला आवडत नाही. ती म्हणाली, “मी जेव्हा रणबीरला काही बोलते तेव्हा तो शांत ऐकून घेतो पण बऱ्याचवेळा ज्या ठिकाणी त्याने काही बोलायची गरज असते. तेव्हाही तो शांत राहतो. अशावेळी त्याचं शांत राहाणं मला त्रासदायक वाटतं. दरम्यान या मुलाखतीमध्ये आलिया आणि रणबीरने एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरणार