मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) आई-बाबा झाले आहेत. आलियानं आज मुलीला जन्म दिला आहे. कपूर कुटुंबामध्ये चिमुकलीच आगमन झाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार अडचणीत – राजू शेट्टी
आज सकाळी सात वाजता गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात आलीया दाखल झाली होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच तिला प्रसूती कळा सुरु होऊन १२ ते १२.३० च्या सुमारास तिने एका गोंडस परीला जन्म दिला. आलीया-रणबीरला मुलगी झाल्यामुळे चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण दिसत आहे.
आलियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहतेच नाहीतर अनेक सेलिब्रेटी सुद्धा या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये फक्त आलिया आणि रणबीरची चर्चा होती. आणि आता परत देखील ते चर्चेत आहेत.