Shivsena । श्रीकांत शिंदेसह शिंदे गटाच्या सर्व खासदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल; कुणाचा दावा?

Shrikant Shinde

Shivsena । ठाणे : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वपक्षीयांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटल्याने या निवडणुका महत्त्वाच्या असून यात कोणत्या पक्षाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि त्यांच्यासह शिंदे गटावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Love Story । ऐकावं ते नवलच! 35 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीने कॅनडातील 70 वर्षीय ‘आजी’सोबत थाटला संसार

“भाजप (BJP) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खच्चीकरण करत असून त्यांना संपवण्याचे काम सुरु आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या खासदारांना आगामी निवडणूक भाजपच्या तिकीटावरच लढवावी लागू शकते, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Supriya Sule । भाजपच्या खासदाराविरोधी सुप्रिया सुळे यांनी दिली हक्कभंगाची नोटीस, महत्त्वाचं कारण आलं समोर

“लोकनेत्याला जवळ करून त्यांना संपवायचं, अशी भाजपची प्रवृत्ती आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे किंवा भाऊसाहेब फुंडकर हे भाजपचे लोकनेते होते. परंतु त्यांनाच पक्षाने संपवलं. इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांनाही भाजप संपवण्याचे काम करत आहे. भाजपने श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात बैठका घेण्यास सुरु केल्या आहेत. त्यावरून भाजपच्या मनात काय आहे हे दिसून येतं,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.

Buldhana Accident । समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

Spread the love