JP Nadda Vs Uddhav Thackeray : सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार” ; नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

All parties will end, only BJP will remain”; Uddhav Thackeray's reaction to Nadda's statement, said...

मुंबई : शिवसेना संपत आलेला पक्ष आहे. असे वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल केले. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. शिवसेना संपत आलेला पक्ष आहे देशात फक्त भाजप राहणार यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नड्डा यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असे नड्डा बोलतात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न जरी करून पहावा. ठाकरेंनी थेट नड्डा यांनाआवाहन केले.

ठाकरे म्हणाले की, “मी नड्डा यांचे भाषण ऐकलं ते त्यात म्हणतात की काही लोक वीस तीस वर्ष काम करून भाजपात येतात. म्हणजे आम्हाला काही आचार विचार नाही आमचं कर्तृत्व शून्य.भाजपात लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले, जे संपले नाहीत ते इतर सर्व पक्ष संपतील आणि केवळ भाजपाच टिकणार असंही नड्डा म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे बेव वाक्य आहे”.

शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करून पहावा राष्ट्रवादी कुंटुंबाचा पक्ष,काँग्रेस भाऊ-बहिणीचा पक्ष असून भाजपाला वंशवादाविरोधात लढायचं असं ते म्हणतात, पण भाजपाचा वंश कोठून सुरू झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तेच म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपात येत आहेत. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर मग भाजपाचा वंश नेमका कोणता? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला.

काय म्हणाले होते जे पी नड्डा?

“देशात आपल्या विरुद्ध लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष शिल्लक नाही. आपली खरी लढाई ही कुटुंबवाद आणि घराणेशाही यांच्या विरोधात आहे”. भाजप हा विचारधारेवर चालणारा देशातला एकमेव पक्ष आहे असाही उल्लेख त्यांनी केला. जस तमिळनाडूमध्ये घराणेशाही, शिवसेना संपत आलेला पक्ष तोही तसाच आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे देखील घराणेशाही आहे. काँग्रेस तर हा भाऊ बहिणीचा पक्ष झालाय. राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल ,तेलंगणा राष्ट्र समिती असा अनेक पक्षांचा उल्लेख त्यांनी केला. “काँग्रेसने कितीही प्रशिक्षण केंद्रं घेतली तरी त्यांना फायदा होणार नाही. टिकण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज लागते. दोन दिवसात पक्षाचे संस्कार आत्मसात होत नाहीत,” असा टोला देखील जे पी नड्डा यांनी लगावला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *