मुंबई : रविवारी सकाळी सातच्या सुमारास इडीच पथक संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी पोहोचल. त्यांच्या घरातील कागदपत्र व दस्तावेज अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले व साडेअकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यांच्या घरी सापडलेल्या साडेअकरा लाखांचा हिशोब न देता येणे आणि चौकशीला सहकार्य न करणे या दोन आरोपांखाली त्यांना 1 ऑगस्ट 2022 रोजी पावणे एक वाजता संजय राऊतांना अधिकृतपणे ED कडून अटक करण्यात आली. यावर अनेक व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. आता यामध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“फक्त 11 लाख रुपयांसाठी त्रास का दिला जातोय? असा सवाल करतानाच 2024 पर्यंतच हे सर्व सुरू राहील”, असं जया बच्चन म्हणाल्या. या संपूर्ण प्रकरणाला भाजपा जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितले.
सध्या जया बच्चन यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संजय राऊत्यांच्या अटकेबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. ईडीचा दुरुपयोग केला जातोय असं तुम्हाला वाटतं का? यावर उत्तर देत जया बच्चन म्हणाल्या, “ईडीच्या कामावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. 11 लाख रुपयांसाठी तुम्ही अशा प्रकारे कुणाला तरी त्रास देत आहात”.
पुढे अजून एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ईडीचा वापर कधीपर्यंत चालेल असं तुम्हाला वाटतं? यावर जया बच्चन यांनी खूप कठोर शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, 2024 पर्यंत हे सर्व चालेल.