Khichdi Scam Case । मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कोरोना काळात दिलेल्या कंत्राटामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील अनेक दिवसांपासून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत. कथित बॉडी बॅग घोटाळा (Body bag scam) प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातदेखील आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Khichdi Scam)
Ganeshotsav । महाराष्ट्रातील ‘या’ गावात कोणाच्याच घरी केली जात नाही गणरायाची प्रतिष्ठापना, कारण..
याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (Economic Offenses Branch) पाच तास कसून चौकशी करण्यात आली आहे. किर्तीकर यांनी कंत्राटदाराला खिचडी वितरणाचं कंत्राट मिळवून दिले असावे, असा संशय आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला आला आहे. त्यांच्यावर तब्बल 6.37 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान कॅगच्या अहवालानुसार या प्रकरणात तब्बल 12,024 कोटी रुपयांची अनियमितता झाली असावी असे म्हटलं होतं.
NCP Crisis । शरद पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते अजित पवारांच्या गळाला
त्यानंतर ईओडब्ल्यूने मागील महिन्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची याच प्रकरणी चौकशी केली होती. आता काल सकाळी 11.30 वाजता या प्रकरणी अमोल किर्तीकर यांची चौकशी केली. दरम्यान अमोल किर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र असून ते ठाकरे गटासोबत आहेत त्यामुळेच त्यांची चौकशी केली जात आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.