
मुंबई : कोरोना महामारीनंतर राज्यात यंदाच्या वर्षी सगळेच सण उस्तव आनंदात पार पडले आहेत. नुकताच गणेशोत्सव फार थाटामाटात साजरा झाला. दरम्यान आता नवरात्रौत्सवात (Navratri festival) देखील असाच उत्साह कायम राहावा अशी आमदार प्रकाश सुर्वे यांनी (Prakash surve) मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.
Video: ‘ए भाई, जरा देख के चलो’, पाकिस्तान संघांवर दिल्ली पोलिसांची व्हिडिओ शेअर करत मजेशीर टीका
२६ सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवात गरबा-दांडियाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी (allowed) द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. नवरात्रौत्सव हा नऊ दिवस चालतो.म्हणजेच सोमवारी दिनांक २६ सप्टेंबर ते मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबरपर्यंत यंदा नऊ दिवस हा उत्सव चालणार आहे.
राज्यात तसेच मुंबईत ठिकठिकाणी नवरात्रौत्सवात गरबा-दांडियाचे आयोजन केले आहे. नवरात्रौत्सव हा उत्सव सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येऊन तसेच कायद्याचे पालन करत उत्साहात साजरा करतात. जशी गुजरात, राजस्थान व इतर राज्यात नऊ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते, तशीच आपल्या महाराष्ट्रात देखील आपण परवानगी द्यावी, ही नम्र विनंती अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
Ajit Pawar: “मी वॉशरुमलाही जायचं नाही का?”, अजित पवार संतापले
कोरोनामुळे राज्यात दोन वर्षे कोणतेच सण-उत्सव साजरे झाले नाहीत. दरम्यान यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळाष्टमीपासून सर्व उत्सवांवरील निर्बंध कमी केले.तसेच गणेशोत्सवही निर्बंधाशिवाय साजरा झाला. त्यामुळे नवरात्रीत १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.