Site icon e लोकहित | Marathi News

नागपूर मधील सांस्कृतिक महोत्सवात अल्लू अर्जुन राहणार उपस्थित; नितीन गडकरी यांनी दिली माहिती

Khasdar Sanskrutik Mahotsav)

नागपूर मधील खासदार सांस्कृतिक महोत्सव( Khasdar Sanskrutik Mahotsav) विशेष प्रसिद्ध आहे. विशेष परंपरा असणारा हा महोत्सव यंदा डिसेंबर महिन्यात होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुनही या कार्यक्रमात उपस्थिती लावणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

निर्मला सीतारामन यांची महत्वाची घोषणा! किसान क्रेडिट कार्ड धारकांना मिळणार सहज कर्ज…

२०२१ मध्ये हा महोत्सव दोन टप्प्यांत घेण्यात आला होता. यावर्षी देखील मार्चमध्ये हा महोत्सव घेण्यात आला. आता पुढील महोत्सव मात्र डिसेंबर मध्ये होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी अभिनेता अल्लू अर्जुन याला पत्र लिहिले असून महोत्सवादरम्यान तो भारतात असेल तर नक्कीच या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे.

बिग ब्रेकिंग! महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

नागपूर मधील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अमित त्रिवेदी, कविता कृष्णमूर्ती, मोहित चव्हाण या गायकांचे लाईव्ह कार्यक्रम होतील. तसेच कवी शैलेश लोढा यांच्या हास्यव्यंग कवितांचा कार्यक्रम, ‘चाणक्य’ महानाट्य, ‘तथागत’ हे भगवान बुद्धांवरील महानाट्य, ‘पुण्यश्लोक अहिल्या’ हे महानाट्यही सादर केले जाणार आहे.

धक्कादायक! पती आवडत नाही म्हणून पत्नीने केला खून; गळा दाबून टाकले मारून

Spread the love
Exit mobile version