
मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत. आता पुण्यापाठोपाठ साताऱ्यामध्ये देखील कोयता गॅंगने दहशद निर्माण केली आहे.
“वादळ येत आहे…”, रितेश देशमुखचे पठाण चित्रपटाबाबत केलेले ट्विट चर्चेत
सातारा शहरात कोयता नाचवून दहशद माजविण्याचा प्रकार घडला आहे. सातारा शहरातील पोवई नाका परिसरामध्ये वाहन चालकांना कोयता उगारून लुटमारीचा प्रकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तेथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक पाय निकामी असून देखील सहावीत शिकणाऱ्या चिमुकल्याने सर केला रायगड किल्ला!
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. यावेळी गॅंगला पकडताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नाहीतर हत्याच!