Ajit Pawar: मुख्यमंत्री देखील जनतेतूनच थेट निवडून आणा – अजित पवार

Also elect the Chief Minister directly from the people - Ajit Pawar

मुंबई : आज विधानसभेत थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडीच्या विधेयकावर चर्चा झाली.दरम्यान बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी (ajit pawar)हा निर्णय मान्य नसून यास विरोध असल्याचे सांगितले. यावेळी अजित पवार सवाल उपस्थित करत म्हणाले की , नगरविकास मंत्री असताना जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडीला विरोध होता, आता मुख्यमंत्री(CM)झाल्यावर अडीच वर्षांत निर्णय कसा बदललात.?

Sanjay Raut : संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम ‘एवढ्या’ दिवसांनी वाढला

लोकशाहीला घातक, लोकांच्या फायद्याचे नसलेले निर्णय घेतले गेले. यामुळे ही सिस्टिम राबवू नये.फडणवीसांनी (Devendra Fadanvis)आपल्या काळात ही सिस्टिम चालू केली.मग तुम्ही मुख्यमंत्री देखील जनतेतूनच थेट निवडून आणा. नगराध्यक्ष, सरपंच जनतेतून निवडून आणायचा आणि मुख्यमंत्री आमदारांपैकी निवडायचा, असे कसे चालेल.

पुढे अजित पवार म्हणाले की , सभागृहात अनेक नगरसेवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात.मग त्यांच्या धनाढ्य, मसल पावर असलेल्या लोकांचाच विजय होणार ना मग गरीबाने काय करायचे? त्याच्याकडे तेवढे पैसे असतील का? यातून गुन्हेगारी, दादागिरी वाढत जाईल. यामुळे जनतेतून हे लोक थेट निवडून आणायचे विधेयक सरकारने मागे घ्यावे असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Mohit Kamboj: “बारामती ॲग्रोचा अभ्यास सुरु” अडचणीत येणारा राष्ट्रवादीचा पुढचा नेता रोहित पवार?, मोहित कंबोज यांचा इशारा

तसेच अजित पवार यांनी राज्य सरकारने दिलेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदान करण्याचा हक्काच्या निर्णयाचं स्वागत करत असताना अजित पवार यांनी काही शंकाही उपस्थित केल्या आहेत. यावेळी पवार म्हणाले की, ‘शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. राज्यातील अनेक बाजार समित्या एवढा खर्च पेलू शकणार नाही. निवडणुकीचा खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे.मग खर्च झेपणार नसेल तर निवडणुका थांबवणार का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Devendr Fadanvis-Ajit Pawar: मेटेंच्या अपघातावर फडणवीस आणि अजित पवारांनी केली ‘ ही’ चर्चा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *