आजकाल सगळीकडेच मोठ्या प्रमाणात आधुनिकिकरण झालेले दिसत आहे. मोठी- मोठी घरे, मोबाईल फोन व आधुनिक सोयी-सुविधा यामुळे लोकांच्या राहणीमानात बदल झालेला आहे. मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. इंटरनेट ( Internet) तर आजची गरज बनली आहे. या गोष्टींशिवाय जगण्याची कल्पना देखील आपण सध्याच्या काळात करू शकत नाही.
ईशान किशन ‘तो’ झेल आणि स्टेडियम मध्ये जल्लोष सुरू; फिल्डिंग कोच यांनी देखील केले कौतुक
आता तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. परंतु, आंध्र प्रदेशातील एका गावात यातल्या कुठल्याच सोयी नाहीत. मात्र तरी देखील हे लोक सुखाने जगत आहेत. श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगम गावापासून सहा किलोमीटरवर वसलेले हे कुर्मग्राम ( Kurmgram) गाव आहे. सुमारे साठ एकर परिसरात हे गाव वसलेले असून या गावात अत्यंत कमी सोयी सुविधांमध्ये लोक राहत आहेत.
मोठी बातमी! उर्फी जावेद करणार भाजपमध्ये प्रवेश?
कूर्मग्राम मध्ये एकूण ५६ घरे असून, ती सिमेंट आणि स्टील न वापरता उभारली आहेत. गावात मातीचे घर अन् शेणाने सारवलेल्या भिंती आहेत. या गावातील एकाही व्यक्तीकडे कोणतेही आधुनिक उपकरण किंवा सोयीसुविधा नाहीत. तसेच संपूर्ण गावात संपर्कासाठी फक्त एकच लँडलाइन फोन आहे. येथे वीज, मोबाइल, इंटरनेट नाही. हा जीवनमार्ग इथल्या लोकांनी स्वतःहून स्वीकारला असून साधी राहणी व उच्च विचारांवर हे लोक जगत आहेत.