Ambadas Danve । महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. यंदा नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी खळबळजनक विधान केले आहे. (Latest marathi news)
Sanjay Raut । खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत सूत्रधार! बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ” संदिपान भुमरे यांचं नाव अजून निश्चित झालं नाही. आमचा उमेदवार निश्चित होऊन 15 दिवस झाले आहेत. संदिपान भुमरे यांचं नाव निश्चित झाले तर चांगलं आहे. कारण ते आमच्या लोकसभा मतदारसंघातले नाहीत. पुढे कसं करायचं त्यांचं ते आम्ही ठरवू, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. (Ambadas Danve on Sandipan Bhumre)
Pushpa 2 Teaser । पायात घुंगरू, डोळ्यात आग अन् उधळला गुलाल; ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर झाला रिलीज
“तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही. तुम्ही काय शिवसेना वाचवणार आहात. तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी भाजपसोबत गेला आहेत. भाजप कसं एकेकाचे ऑपरेशन करते हे तुम्हाला लवकरच समजेल. गोवा बिहार या ठिकाणी भाजप कशी वागली आहे. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे सुख भाजप उपभोगू देणार नाही. तुम्ही इतके दिवस काम केलं ते घरगडी म्हणून काम केलं का?,” असा सवालदेखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
Amol Kirtikar । ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! बडा नेता ईडीच्या फेऱ्यात