Ambani House Visit | फक्त २ रुपयात अंबानींचे घर पाहण्याची सुवर्णसंधी; कसं ते जाणून घ्या

Ambani House Visit | A golden opportunity to see Ambani's house for just Rs 2; Learn how

अंबानी हे प्रमुख भारतीय उद्योगपती आहेत. विशेषत: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि सर्वात मोठे भागधारक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत 9 नंबरवर असलेल्या अंबानींचे घर आता तुम्हाला पाहता येणार आहे. इतक्या श्रीमंत माणसाचे घर तुम्हाला पहायला मिळणार आहे. अंबानींचे कुटुंब प्रचंड चर्चेत असतं. दरम्यान या घोषणेमुळे हे कुटुंब सध्या बरेच चर्चेत आहे. धीरूभाई अंबानींनी या कुटुंबाच्या व्यवसायाचा पाया भक्कम रचला. चोरवाड या गावी अंबानी कुटुंबाचे एक शतक जुनं पिढीजात घर आहे. या घराला आता धीरूभाई अंबानी मेमोरियल हाऊस या नावाने ओळखले जाते. माहितीनुसार या घरासाठी अंबानी कुटुंब सुरुवातीस भाडे देत होते. 2002 मध्ये या कुटुंबाने हे घर खरेदी करत 2011 मध्ये त्या घराला मेमोरियल हाऊस असे नाव दिले.

सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज! एलपीजी गॅसचे दर झाले कमी, जाणून घ्या नवीन दर

या घरासोबत या कुटुंबाच्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत. 1955 मध्ये या घरात धीरूभाई आणि कोकिलाबेन यांचा सुखाचा संसार चालू होता. पुढील 8 वर्ष ते याच घरामध्ये राहिले होते. जवळ जवळ एक दोन एकरांमध्ये पसरलेल्या हा आलिशान मेमोरियल हाऊस दोन भागांमध्ये विभागला आहे. पर्यटकांसाठी हा हाऊस खुला करण्यात आला आहे. परंतु एक भाग अजूनही खाजगी ठेवण्यात आला आहे. कारण कोकिलाबेन अधूनमधून तिथं राहण्यासाठी जातात. तर उर्वरित दुसरा भाग हा सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. या मेमोरियल हाऊस सोबत अंबानी कुटुंबाच्या काही खास आठवणींचे फोटोज देखील पर्यटकांना येथे पाहता येणार आहेत.

कुणी पाय गमावला तर कुणी हात गमावला… रक्ताने माखलेले शरीर.. ट्रेन अपघाताचे फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

अंबानींच्या या आलिशान घरात वेगवेगळ्या कारागिरीच्या खोल्या, किचन आणि अजूनही बऱ्याच गोष्टी पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. त्या वैशिष्ट्यपूर्ण घरातील बारकाईने बनवण्यात आलेले फर्निचरसुद्धा पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हे हाऊस गिफ्ट शॉपसुद्धा आहे, ज्यामुळे तुम्हाला अंबानी कुटुंबा संदर्भातील काही गोष्टी देखील खरेदी करू शकता येणार आहेत.

अवघ्या महिनाभरातच तुकाराम मुंढे यांची बदली; ‘या’ महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांसाठी हे मेमोरियल हाऊस खुल करण्यात आलं आहे. सोमवार सोडता संपूर्ण आठवडाभर हे हाऊस पर्यटकांच्या भेटीसाठी खुलं करण्यात आलं आहे, आणि विशेष बाब म्हणजे यासाठी प्रवेश फी फक्त दोन रुपये ठेवण्यात आली आहे.

सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *