भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणून अंबानी कुटुंब ओळखले जाते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ( Anant Ambani) याचा साखरपुडा नुकताच राधिका मर्चंटसोबत पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लवकरच हे दोघे लग्नगाठ देखील बांधणार आहेत. दरम्यान या दोघांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीस भरतीबाबत समोर आली मोठी अपडेट! वाचा सविस्तर
एका अहवालानुसार राधिका मर्चंट (Radhika Merchant) अनंत अंबानीपेक्षा एक वर्षांनी मोठी आहे. अनंतची होणारी पत्नी राधिका मर्चंट हिचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी गुजरातमध्ये झाला. तर अनंत अंबानीचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला आहे. यामुळे राधिका आणि अनंत यांच्या वयात एका वर्षांचं अंतर आहे. खरंतर राधिका ही अनंत अंबानीची बालमैत्रीण आहे.
शिवसेना भवन कोणाचं? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
राधिका मर्चंट ही एनकोर हेल्थकेअर (Encore Healthcare) या कंपनीचे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाला शास्त्रीय नृत्याची प्रचंड आवड आहे. जवळजवळ आठ वर्षे तिने भरतनाट्यमचचे शिक्षण घेतले आहे. मुंबईच्या श्री निभा आर्ट अकादमीत गुरु भावना ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत.
‘या’ नावाने उद्धव ठाकरेंनी पक्ष काढावा, शिंदे गटाच्या मंत्र्याने दिला सल्ला