Accident News । धक्कादायक! दारूच्या नशेत होत्याच नव्हतं झालं, रिक्षा आणि दुचाकीच्या धडकेत तीन जण ठार

Ambarnath Car Rickshaw Bike Accident

Accident News । अंबरनाथ : अंगावर शहारे आणणारा एक भयंकर (Accident) अपघात घडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने कार आणि एका दुचाकीला धडक (Car Rickshaw Bike Accident) दिली आहे. ही धडक इतकी जोरात होती की यात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दारूच्या नशेत कारचालकाने हा अपघात केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी; एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

ही संपूर्ण घटना कल्याण,बदलापूर राज्य महामार्गावरील शांतीनगर भागात (Ambarnath Accident) घडली आहे. पहाटेच्या दरम्यान, एका मद्यधुंद कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका रिक्षा आणि एका दुचाकीला जोरात धडक दिली. भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा थराराचा सीसीटीव्हीत (CCTV Footage ) कैद झाला आहे.

Zika Virus । सावधान! नाशिकमध्ये झिका व्हायरसबाबत प्रशासन अलर्ट मोडवर, घरोघरी सर्वेक्षण चालू

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरु करत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Aayush Sharma Car Accident Update । सलमानच्या मेहुण्याच्या कार अपघातप्रकरणी समोर आली मोठी अपडेट!

Spread the love