Amit Shah । राज्य विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार करत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज शिराळा येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. शहा यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत सांगितले की, “शरद पवार तुमच्या चार पिढ्या आल्या तरी काश्मीरसाठी असलेले कलम 370 पुन्हा लागू होणार नाही.” त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विरोधातील मुद्द्यांवर भाष्य करत, मोदी सरकारने कलम 370 रद्द केले असून यावर कोणताही चर्चा न करता काश्मीरच्या विकासासाठी काम करत असल्याचे स्पष्ट केले.
शहा पुढे म्हणाले की, “महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगरचे नामकरण मान्य नाही, पण ते नक्कीच होणार आहे.” त्यांनी सांगितले की कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या जमीनी वक्फ बोर्डाला दिल्या, आणि असा काही प्रकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही. असं ते म्हणाले.
Congress । सर्वात मोठी बातमी! काँग्रेस ऍक्शन मोडवर, बंडखोर नेत्यांविरोधात केली मोठी कारवाई
अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या सरकारने शिराळ्यात बंद केलेली नागपंचमी पूजा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. “महायुतीचे सरकार आल्यास नागपंचमी पूजा पारंपरिक पद्धतीने सुरू केली जाईल,” असे ते म्हणाले.
Devendr Fadanvis । ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा, ‘या’ गोष्टी देणार शेतकऱ्यांना