मुंबई : काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे राजकिय वर्तुळात भाजपा – मनसे युती होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे . तसेच अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान भाजपा आणि मनसे युती होणारं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे.
Asia Cup 2022: भारतीय संघाला मोठा धक्का, हा महत्वाचा खेळाडू आशिया चषकातून बाहेर; कारण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत असल्यानं शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटींची चर्चा होत आहे. अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शाह मार्गदर्शन करतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. या निमित्ताने काही ना काही राजकीय बैठक होईलच असा अंदाज बांधला जात आहे. भाजपा आणि मनसेकडून अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी बरोबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हे कार्य करण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्या एकत्रीकरणातून होणार असल्याच त्यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुका पुढील वर्षीच्या सुरूवातीला होतील , असे म्हटले जात असताना दोन – अडीच महिन्यांतच मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी भाजपने चालविली आहे . याच पार्श्वभूमीवर अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.