Site icon e लोकहित | Marathi News

Amit Shaha । शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष कोणामुळे फुटला? अमित शहा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Amit Shaha

Amit Shaha । मागील दोन वर्षात राज्यातले दोन मोठे पक्ष फुटले. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात फूट पाडून भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील मोठी फूट पाडली. अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने दोन्ही पक्ष फोडले असे भाजपवर आरोप केले जात आहेत, यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Abhishek Ghosalkar । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; धक्कादायक CCTV फुटेज समोर

“बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनच शिवसेना पक्षामध्ये काम करणाऱ्यांनी सर्वात अगोदर उद्धव ठाकरे यांना आपला नेता म्हणून स्वीकारले होते.पण त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना आपला नेता म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचं होते. तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना देखील त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या बनवायच्या होत्या”.

Ajit Pawar । अजित दादांनी खेळली मोठी खेळी

“शरद पवारांचा हा निर्णय अनेक पक्षातील अनेकांना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडून दिला. जर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना चांगली वागणुक दिली असती तर शिवसेना फुटलीच नसती. तसेच अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी योग्य दिली असती तर पक्ष फुटला नसता, ” असे विधान अमित शहा यांनी केले आहे. यावर आता ठाकरे गट आणि शरद पवार गट काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Artificial Intelligence । तज्ञांनी दिला धोक्याचा इशारा! मृत व्यक्तींना जिवंत ठेवण्याने होतो मोठा धोका

Spread the love
Exit mobile version