Amit Thackeray । सध्या मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) आज माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. खारघर मधील एका रुग्णालयाच्या बाहेर मोठाराडा झाला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
Sunil Kedar । आताच्या घडीची मोठी बातमी! काँग्रेस नेते सुनील केदार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा
माहितीनुसार, माथाडी कामगारचे नेते महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर मनसे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी महेश जाधव दाखल असलेल्या रुग्णालयाकडे मोर्चा वळवला. यानंतर मनसैनिक रुग्णालयात आल्याचे समजल्यानंतर माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली.
माथाडी कामगार मोठ्या संख्येने असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी पळ काढला. मनसे कार्यकर्ते एका सोसायटीमध्ये लपले होते. त्यावेळी माथाडी कामगारांनी सोसायटीच्या देखील सिक्युरिटी रूमच्या काचा फोडल्या. त्याचबरोबर आक्रमक झालेल्या मनसे सैनिकांनी देखील कामोठ्यातील महेश जाधव यांचे कार्यालय फोडल्याची माहिती मिळत आहे. सध्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिला सर्वात मोठा इशारा