
Amitabh Bachchan । महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांनी अनेक चित्रपटात (Amitabh Bachchan Film) काम केले आहे. विविध पुरस्कारांनी अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर ते सतत सक्रिय असतात. सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येणारे अमिताभ बच्चन आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Latest marathi news)
Accident News । धक्कादायक! पुण्यात भरधाव टँकरची तरुणाला धडक, कॅमेऱ्यात कैद झाली अपघाताची भीषण दृश्य
दरम्यान, अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात (Kokilaben Ambani Hospitals) दाखल केले होते. चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. अशातच आता चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. पायात क्लॉट झाल्यानं अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली, असे बोलले जात आहे.
Politics News । मोठी बातमी! अजित पवार गटाचा बडा नेता करणार शरद पवार गटाच्या वाटेवर, सिल्व्हर ओकवर…

अमिताभ बच्चन यांनी अँजिओप्लास्टीनंतर नुकतेच एक ट्विट शेअर केले आहे, ज्यात त्यांनी असं लिहिलं की,”मी तुमचा सदैव आभारी आहे.” सध्या अमिताभ बच्चन हे रुग्णालयातच असून त्यांना अद्याप डिस्चार्ज मिळालेला नाही. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया ज्ञात आली नाही. त्यांच्यावर डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
Ajit Pawar । “…तर गाठ माझ्याशी आहे”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना गंभीर इशारा