Amol Kirtikar । मुंबई : एकीकडे निवडणुकीच्या (Loksabha election) तारखा जवळ आल्या आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. ठाकरे गटाचा बडा नेता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नेत्याला महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आले आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election 2024) तोंडावरच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
IPL 2024 । लखनऊला सर्वात मोठा झटका! स्टार खेळाडूला मोठी दुखापत, एकाच ओव्हरनंतर…
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडीने ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांना हजर राहण्याचे समन्स पाठवलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणांमध्ये (BMC Covid Scam) गुन्हा दाखल केल्यानंतर या सगळ्याचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. या घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीने अटक केली आहे.
Sharad Pawar । ‘…त्यांना त्यांची जागा दाखवणार’; शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका
असे असताना आता अमोल कीर्तीकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांना ईडीने समन्स दिलं होतं. पण आता निवडणुकीआधी त्यांची चौकशी होणार आहे.
Lok Sabha Election । मतदारांसाठी शानदार ऑफर! ‘…. तर हॉटेलमध्ये मिळणार डिस्काउंट’