राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांचे ‘शिवपुत्र संभाजी’ नाटक बरेच चर्चेत आहे. ( Shivputra Sambhaji Drama) या महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रभर सुरू होते. मात्र खुद्द अमोल कोल्हे यांनाच दुखावत झाल्याने ‘शिवपुत्र संभाजी’ चे पुढचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. या महानाट्याच्या एका प्रयोगावेळी घोड्यावर बसून एन्ट्री घेत असताना अमोल कोल्हे यांना दुखापत झाली आहे. यावेळी त्यांना त्वरित रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. परंतु तरीदेखील डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) मधील कल्याणी मैदानावर २८ एप्रिलपासून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. या नाटकात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत आहेत. काल (दि.30) नाटक सुरू असताना अमोल कोल्हे घोड्यावरून संभाजी महाराजांची एन्ट्री घेत होते. यावेळी घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला. यामुळे पाठीला जर्क बसून अमोल कोल्हे यांच्या मणक्याला दुखापत झाली.
यावेळी पाठीत कळ आल्याने त्यांना त्वरित घोड्यावरून उतरवण्यता आले. परंतु त्या परिस्थितीत सुद्धा डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधे घेतली व चेहऱ्यावर दुखापतीचे भाव उमटू न देता जिद्दीने प्रयोग सादर केला. मात्र डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला असल्याने या नाटकाचे उर्वरित प्रयोग होणार नाहीत. त्यातल्या त्यात आज महाराष्ट्र दिन असल्याने दुखापत झाली असली तरी अमोल कोल्हे प्रयोग सादर करणार आहेत.
Health Updates | जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या सविस्तर