Amol Kolhe Meet Sharad Pawar । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना ओपन चॅलेंज दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी भल्या पहाटे शिरूर मतदार संघाची पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांनी शिरूर मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा देखील घेतला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Amol Kolhe Meet Sharad Pawar)
अमोल कोल्हे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असून उद्यापासून काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रेश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याचे देखील यावेळी अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. उद्याच्या मोर्चासाठी शरद पवारांचं मार्गदर्शन घेतल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Politics News )
Kerala Bridge Collapse । केरळमध्ये ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान पूल कोसळला, अनेकजण जखमी
दरम्यान, अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिल्यानंतर अमोल कोल्हे आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेलती आहे. त्यामुळे सध्या या भेटीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या भेटीवरून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.