
Amol Kolhe । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज देत आगामी निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करणार असल्याची माहिती दिली. यानंतर आज अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी ट्वीट केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे. (Amol Kolhe Vs Ajit Pawar News)
पाहा अमोल कोल्हे यांचे ट्विट
आजच्या दिवसाची सुरुवात संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्र व देशाचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या लोकनेत्याला भेटून….!
“आज देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि उद्या दिनांक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या दरम्यान होणाऱ्या किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे “शेतकरी आक्रोश मोर्चा” च्या तयारीबद्दल माहिती दिली. आदरणीय शरद पवार साहेबांचं धोरण हे कायमच शेतकरी हिताचं असतं, म्हणूनच त्यांना मायबाप जनता ‘ शेतकऱ्यांचा कैवारी ‘ म्हणून ओळखते! या शेतकरी आक्रोश मोर्चा बद्दल त्यांचं याआधी सुद्धा मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं. आजची त्यांची भेट शेतकऱ्यांसाठी आणखी जोमाने लढण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारी होती! यावेळी आ.अशोक बापू पवार सुद्धा सोबत होते.” असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केले आहे.
आजच्या दिवसाची सुरुवात संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्र व देशाचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या लोकनेत्याला भेटून….!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 26, 2023
आज देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि उद्या दिनांक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या… pic.twitter.com/YCyKWDO5tA
त्याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत भेट झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी राजीनामा देण्याबाबात अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी झालेली चर्चा खाजगी स्वरुपाची चर्चा होती. खाजगी चर्चा जाहीर करायची नसती. मात्र त्यामागची परिस्थिती वेगळी होती ती देखील बाहेर यायला हवी, असं देखील अमोल कोल्हे म्हणाले आहेत”.