अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
देवेंद्रजी, राजीनामा द्या!; सुप्रिया सुळेंच्या विधानावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृत्तपत्रातील बातमीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अमोल कोल्हे लवकरच अभिनेत्री अमृता खानविलकरसह लग्नगाठ बांधणार अशी या बातमीची हेडलाईन आहे. या बातमीचा फोटो शेअर करत अमोल कोल्हे यांनी लिहिले की, “हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहित होतं… नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!” असं त्यांनी लिहिलं आहे.
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तीन जण जागीच ठार
सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत असून यावर काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. या पोस्टवर चक्क अभिनेत्री अमृता खानविलकरनेही (Amruta Khanwilkar) ही पोस्ट वाचून “हे काय आहे??” अशी कमेंट देखील केली आहे.
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा