
विरोधक व सत्ताधारी यांच्यातील टीकायुद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. काल वर्धा येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत असताना नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी नितेश राणे यांना आता सडेतोड उत्तर दिले आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये. अशा शब्दांत त्यांनी नितेश राणेंना धारेवर धरले आहे.
“वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्या लोकांनी विचार करुन बोलावे. बोलत असताना लोकांचे संस्कार प्रकट होतात. महाराष्ट्रातील राजकारणाला सुसंस्कृतपणाचा आदर्श आहे. नाहीतर, माईकवरच बोलायचे असेल तर मला ही बोलता येते. परंतु, इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण मध्ये आणत नाही.” असे म्हणत अमोल कोल्हेंनी नितेश राणे यांना फटकारले आहे.
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार
त्याच झालं असं होतं की, एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणेंनी “अमोल कोल्हे कुठे भेटू दे त्याला दाखवतोच.” असे सुनावले होते. तसेच “अमोल कोल्हे नावाचा कुठला तो ॲक्टर ! काही फुकट काम करत नाही. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो फक्त नावासाठी खासदार झाला असून तो फक्त सिरीयल पुरता मर्यादित आहे. त्याने जर दाढी काढली तर कोणीही ओळखणार नाही.” असे नितेश राणे म्हणाले होते. म्हणूनच अमोल कोल्हेंनी त्यांना आता धारेवर धरले आहे.
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार