एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड मिळाल्यामुळे भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतंच खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील याबद्दल ट्वीट केले आहे.
ट्विट करत अमोल कोल्हे यांनी लिहिले की, “देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे! स्वत: प्रादेशिक उद्योगातून आल्याने मला उत्सव साजरा करण्याचे आणखी एक कारण मिळते कारण हिंदी चित्रपटांच्या पलीकडे प्रादेशिक भारतीय चित्रपटांकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले जाते! RRR च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन”
This is such a proud moment for the country! Coming from a regional industry myself gives me even more reason to celebrate as regional Indian films beyond Hindi movies are getting their long due share of attention!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 13, 2023
Congratulations to the entire team of #RRR #NaatuNaatu #Oscar pic.twitter.com/PIB2yXZLBo
“मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि तो दिवस अखेर आलाच आणि त्या क्षणानं साऱ्यांना आनंदित करुन टाकले. ज्यावेळी आरआरआऱच्या टीमनं ऑस्कर स्विकारला त्यावेळी त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द देखील सुचत नव्हते. या पुरस्कारांमध्ये हॉलिवूड चित्रपटांचा देखील समावेश होता त्यामुळे आरआरआर (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याला ऑस्कर मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याला ऑस्कर मिळाला याचा आनंद गगनात न मानवणारा आहे.
शेतकरी आजींनी यूट्यूबवरून कमावले लाखो रुपये; अन् आजींचा पहिला वहिला विमान प्रवास होतोय व्हायरल