“दिसेल तिथे ठोकून काढा”, बागेश्वर बाबांच्या संत तुकाराम महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावर अमोल मिटकरी संतापले

Amol Mitkari furious over Bageshwar Baba's offensive statement about Sant Tukaram Maharaj, "Knock it out where you see it"

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची असे वक्तव्य बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बागेश्वर बाबा यांच्या या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. यामध्येच आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर ढसाढसा रडू लागली शेफाली वर्मा

वारकरी संप्रदायाने बागेश्वर बाबाच्या विधानाची दखल घ्यावी. ज्या ठिकाणी हा बाबा दिसेल त्या ठिकाणी धरून त्याला ठोका अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.

धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? आज लेखी युक्तीवादासाठीचा अखेरचा दिवस

नेमके कोण आहेत बागेश्वर बाबा?

बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) हे छतरपूर (Chhatrapur) जिल्ह्यातील आहेत. येथील बागेश्वर धाम हनुमान या मंदिराचे पुजारी व कथावाचक म्हणून त्यांना ओळखले जात होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shatri) हे त्यांचे मूळ नाव आहे. छतरपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला असून त्यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले होते. बागेश्वर बाबांचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु, त्या पुढील शिक्षणासाठी बाबांना वृंदावन येथे पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे एक हजार रुपये न्हवते. म्हणून बागेश्वर बाबांनी शिक्षण सोडून वडिलांसोबत कथा वाचण्यास सुरुवात केली.

चार हजार तलाठी भरती संदर्भात समोर आली मोठी अपडेट; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *