मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मुंबईमध्ये बोलताना मोहित कंबोज यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्विट भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सकाळी केले होते. मोहित कंबोज (Mohit Kamboj) हा कुणी तत्ववेत्ता किंवा भविष्यकार नाही. हा प्रेस कॉन्फरन्स घेणार, काहीतरी जुने घोटाळे काढणार आणि महाराष्ट्राचे वातावरण खराब करणार, असा गंभीर आरोप अमोल मिटकर यांनी मोहित कंबोज यांच्यावर केलेला आहे.
मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. हा भाजपाचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. याचसोबत ईडी कुठे धाड टाकत आहे, हे जर त्याला माहीत असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील मिटकरी यांनी यावेळी केलेली आहे. मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी हा एक परिवार आहे. त्याने पत्रकार परिषद घ्यावी, हा त्याचा अधिकार आहे. मात्र वातावरण खराब करू नये. आमच्या सर्व आमदारांची बैठक अजित पवारांनी आज बोलावली आहे. या सरकारविरुद्ध आम्ही आक्रमक राहणार आहोत असे देखील ते म्हणालेले आहेत. याचसोबत आज अधिवेशन होत आहे. कमी कालावधीचे हे सरकार आहे. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असे हे बोलले होते. मात्र असे काहीही झाले नाही असे देखील ते म्हणालेले आहेत.