Amruta Fadnavis : “मी काय घाबरते त्यांना…”, देवेंद्र फडणवीसांबद्दल अमृता फडणवीसांनी केला मोठा खुलासा!

Amrita Fadnavis made a big revelation about Devendra Fadnavis!

मुंबई : ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम झी मराठीवर चालू आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली.

या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांना लपून तुम्ही खरेदी करता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देत अमृता फडणवीस म्हणाल्या, कधीच नाही असे लिहिलेला बोर्ड उचलत मी लपून खरेदी करत नाही. असे सांगितले. त्यासोबत मी काय घाबरते त्यांना, असं देखील म्हणाल्या.

अमृता फडणवीसांणी दिलेले उत्तर ऐकून प्रेक्षक खळखळून हसू लागले. तर सुबोध भावे यांनीही हसत त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *