अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांचे गाणे रिलीज होताच काही वेळातच लाखो व्हयूज आले आहेत.
अजामीनपात्र वॉरंट जारी होताच संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” या गाण्यामध्ये अमृता फडणवीसांनी डान्स देखील केला आहे. या गाण्यातून प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळतोय.
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत! भर स्टेजवर नाचताना एका मुलाला केलं किस
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी त्यांच्या गाण्याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गाण्याचा टीझर शेअर केला होता. या टीझरमध्ये अमृता फडणवीस गाण्याबरोबरच डान्सही करताना देखील दिसत आहेत. सध्या त्यांच्या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत! भर स्टेजवर नाचताना एका मुलाला केलं किस