अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांचे गाणे रिलीज होताच काही वेळातच लाखो व्हयूज आले आहेत. या गाण्यामुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आले मात्र त्यांनी देखील ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
राहुल गांधी टी-शर्टच्या आतमध्ये थर्मल घालतात; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आता अमृता फडणवीस यांनी त्यांच्याच नवीन गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या रील व्हिडीओसाठी अमृता फडणवीस यांनी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास वेस्टर्न लूक केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सौर पंपासाठी मिळणार 90 टक्के अनुदान
दरम्यान, “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” या गाण्यामध्ये अमृता फडणवीसांनी डान्स देखील केला आहे. या गाण्यातून प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळतोय.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सौर पंपासाठी मिळणार 90 टक्के अनुदान