Amrita Fadnavis Song । महाशिवरात्रीच्या निमित्तानं अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा Video

Amruta Fadavnis

Amrita Fadnavis Song । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गायनाची आवड आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पुन्हा एकदा नवीन गाणे घेऊन त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्तानं अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप

महाशिवरात्रीच्या निमित्तानं देवाधी देव महादेव हे गाणं हे गाणं रिलीज झाले आहे. त्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांच्या आवाजानं कमाल केली आहे. त्यामुळे हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. मागच्या काही दिवसांपासून देवाधी देव महादेव गाण्याची चर्चा असून आता ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Viral Video । हातात बंदूक घेऊन मुलीला किडनॅप करण्यासाठी आला बदमाश; मग कुत्र्याने केले असे कृत्य की..व्हिडीओ पाहून व्हाल चकित

युट्युबवर हे गाणे प्रचंड व्हायरल झाले असून नेटकऱ्यांचा देखील याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, अमृता फडणवीस या व्यवसायाने बँकर असून त्या गायिकाही आहेत. त्यांनी गायलेली अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव सर्तम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली आहे.

Pune Crime News । पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती; मिस्ट्री गर्ल आली समोर

Spread the love