Site icon e लोकहित | Marathi News

अमृता फडणवीस यांची संपत्ती पाहून डोळे फिरतील; जाणून घ्या त्यांच्याकडे किती संपत्ती आहे?

Amrita Fadnavis' wealth will make eyes roll; Know how much wealth they have?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचे राहणीमान, त्यांची बोलण्याची पद्धती, गाणी गायची असलेली प्रचंड आवड यामुळे अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. त्यांच्या वेषभूषेवरून त्यांच्या गाण्यावरून त्यांना काही लोक मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करतात. मात्र काही लोकांना त्यांचे राहणीमान, बोलण्याची पद्धती आणि त्यांनी गायलेली गाणी प्रचंड आवडतात. त्यामुळे लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती जाणून घेण्याची देखील नेहमीच इच्छा असते. दरम्यान, आज आपण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत.

झोपलेल्या व्यक्तीजवळ जाऊन बसले तीन चित्ते अन् पुढे घडल असं की, पाहून तुम्हीही व्हाल थक्क; पाहा Video

अमृता फडणवीस यांच्याकडे किती संपत्ती आहे?

अमृता फडणवीस या नागपूर अॅक्सिस बँकेच्या असोसिएट उपाध्यक्षा आहेत. त्यांच्या संपत्तीविषयी पाहिलं तर २०१९मध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणुकीत सादर झालेल्या एफीडिएटनुसार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची आणि पत्नीची स्थावर आणि जंगम मालमत्तेचे डिटेल्स दिले होते. त्याविषयी एका वृत्तसंस्थेने वृत्त देखील दिले आहे

माहितीनुसार, अमृता यांच्याकडे ९९.३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी २.३३ कोटी रुपयांची शेअर बाजारामध्ये गुंतवणुक केली आहे. आणि त्यांच्याकडे रोख रक्कम १२,५०० रुपये असून बँकेत ३ लाख ३७,०२५ रुपये आहेत.

फक्त तीनच आठवड्यांत गौतम अदानींची वाढली ‘इतकी’ संपत्ती; वाचा सविस्तर…

अमृता फडणवीस यांच शिक्षण किती झालय?

अमृता फडणवीस यांचे आईवडील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्याच्या वडिलांचे नाव शरद रानडे आहे तर आईचे नाव चारू रानडे आहे. त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक जीवनाविषयी पाहिले तर अमृता फडणवीस यांनी नागपूरच्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून पूर्ण केले असून येथून अमृता यांनी एमबीएची पदवी देखील घेतली.

अमृता फडणवीस यांना लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी गाणी गायली आहेत. 2016 मध्ये आलेल्या जय गंगाजल या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटामध्ये त्यांनी ‘सब धन माती’ हे गाणे गायले होते. या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळाली होती.

कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळे कर्मचारी आमचेच…”

Spread the love
Exit mobile version