मुंबई : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरवरच्या (Amruta Khanwilkar ) मावशीचं निधन झाल्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अमृताने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अमृताने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे. अमृताची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
इंस्टाग्रामवर अमृताने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा …. छान रहा …. नीट रहा आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील. तू परत लहान होऊन जा. तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांनसाठी …. आमच्या कुटुंबासाठी त्याची परत फेड आम्ही कोणी करूच शकत नाही मम्मा … मी … अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो माऊ तुला खूप मिस करणार ग तुला …. खूप अजून आपल्याला किती फिरायचं होतं बोलायचं होतं …. मॉम ला …मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं पण माऊ तू नीट राहा आता तू काळजी करू नकोस.
अमृता खानविलकरवरची इंस्टाग्राम पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. नेटकरी या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहत आहेत.