
मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) होय. तिने अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. अमृताने बाॅलिवूडमध्ये (Bollywood) देखील चांगली कामगिरी केली आहे. ती कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.
‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवची ती पोस्ट चर्चेत; अशोक सराफ
हिमांशू आणि अमृता एकमेकांना सतत फाॅलो आणि अनफाॅलो करत असतात. काही दिवसांपूर्वी अमृताने तिचा पती हिमांशूला सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली होती. यावर आता अभिनेत्री अमृताने प्रतिक्रिया दिली आहे.
धक्कादायक! पोटच्या मुलाने केली चक्क आईवडीलांचीच हत्या
अमृता म्हणाली की, माझा पती हिमांशू आणि मी सतत एकमेकांना ब्लॉक करत असतो. आम्ही दोघे 18 वर्ष झाली एकत्र राहतो. त्यामुळे आम्हाला याची सवय झाली आहे. पुर्वी आमचे यावरुन वाद व्हायचे. आताही आम्ही भांडतो. पण हे अगदीच बालिशपणासारख आम्ही वागतो.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा
दरम्यान, अमृताने अभिनयापेक्षा तिच्या नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने ‘ वाजले की बारा’ असो किंवा चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर अमृताने प्रेक्षकांना नेहमीच ठेका धरायला भाग पाडले आहे. तर अमृता आणि हिमांशू मल्होत्रा यांनी 2015 मध्ये लग्न केले. त्या दोघांची भेट 2004 साली झाली होती.