Amruta Fadnavis । पुण्यामध्ये नमो वॉकथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी पुण्यातील महिलांना एक मोठा सल्ला दिला आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, “सर्व महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. मी स्वतःकडे लक्ष देते त्यामुळे चमकते. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या आणि चमका” अस अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी एक गाणं देखील गायल.
त्याचबरोबर अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, “एनर्जी ही पुण्यातच असू शकते आणि ती पण पुण्याच्याच महिलांमध्ये जास्त आहे. प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असते आणि ते प्रत्येकाला मिळवायचे असते. त्यासाठी सकाळी लवकर उठून स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. मी देते आणि मी चमकते असं त्या म्हणाल्या आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. यामुळे त्यांची सतत नवनवीन गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. सध्या देखील त्यांनी कैलाश खेर यांच्यासोबत ‘हे राम’ हे भजन गायल आहे. भजन गायनामुळे सुखद आनंदाची अनुभूती आली राममय भारतवर्षात रामभक्तीवर गायन सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळालं असल्याच देखील अमृता फडणवीस म्हणल्या आहेत.
Ajit Pawar । ‘बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा’, अजित पवारांनी भरसभेत केली विनंती