Uddhav Thackeray । काल दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) लोकसभेच्या निवडणुकांची (Loksabha election) घोषणा केली आहे. कालपासूनच आचारसंहिता देखील लागू झाली आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
IPL 2024 । क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! लोकसभेमुळे बदलणार आयपीएलचे वेळापत्रक? समोर आली मोठी माहिती
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातून आमश्या पाडवी (Amshya Padvi) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंनी खूप मेहनत घेतली होती. पण आता तोच नेता शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षप्रवेशासाठी ते कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आमश्या पाडवी यांना एक संधी दिली. 2022 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना अनेक बड्या नेत्यांना डावूलन उमेदवारी दिली होती. दरम्यान, आमश्या पाडवी यांनी याबाबत कोणातही वक्तव्य केले नाही.