पुणे जिल्हा दूध उत्पादन संघाने नुकतीच दुधाच्या दरात वाढ जाहीर केली होती. यापाठोपाठ अमूलने ( Amul) देखील दूध दरात वाढ करत ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. अमूलने प्रति लिटर दुधाच्या दरात ( Milk Rate) तब्बल तीन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून दुधाचे हे नवीन दर लागू होणार आहेत.
आमदार फुटणार उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी आधीच दिली होती माहिती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, अमूलचे ताजाचे अर्धा लिटर दूध आता 27 रुपयांना मिळणार आहे. तर, 1 लिटर पॅकेटसाठी ग्राहकांना 54 रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गोल्ड दुधाचे अर्धा किलोचे पॅकेट आता 33 रुपयांना मिळणार आहे आणि 1 लिटरसाठी 66 रुपये एवढी किंमत असणार आहे.
कमी खर्चात जास्त नफा; ‘अशी’ करा मुळ्याची शेती
इतकंच नाही तर अमूल गायीच्या एक लिटर दुधाचा दर 56 रुपयांवर पोहोचला आहे. तर अर्ध्या लिटरसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय म्हैशीचे A2 दूध आता 70 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. याआधी देखील अमूलने दुधाच्या दरात वाढ केली होती.
मागील वर्षी ऑक्टोंबर मध्ये अमूलकडून दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपये दराने वाढ करण्यात आली होती. मागच्या अख्ख्या वर्षात अमूल दूध एकूण 8 रुपयांची महागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधत ट्विट केले आहे. यामध्ये दुधाच्या वाढत्या किंमती पाहून मोदी सरकारच्या अच्छे दिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात अडकली लग्नबंधनात; पाहा PHOTO