देवाच्या चरणी अनेकजण आपल्या मिळकतीमधील काही भाग अर्पण करतात. दरम्यान एका 80 वर्षाच्या आजीने तर आपल्या आयुष्याची पुंजीच विठ्ठलाच्या चरणी अर्पण केल्याची घटना घडली आहे. या आजींचे नाव फुलबाई चव्हाण असे असून त्यांनी आयुष्यभर काबाडकष्ट करून शेळ्या मेंढ्याच्या मागे जीवन घालवले आहे. यातून पैसे कमावून त्यांनी एक लाख 11 हजार रुपयांची देणगी विठ्ठलाला दिली आहे.
फुलाबाई यांची विठुरायावर (Viththal) निष्ठा आहे. त्यांनी आयुष्यभर मजुरी करत आपल्या मुलांना मोठे केले. सध्या त्यांची मुले मोठी झाली आहेत. तसेच नातवंडे देखील पैसे मिळवू लागली. हे चांगले दिवस विठ्ठलाच्या कृपेने आले आहेत अशी फुलाबाई यांची भावना होती. म्हणूनच त्यांनी आयुष्यभर काबाडकष्ट करून जमा केलेली पुंजी विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचे ठरवले.
दरम्यान फुलाबाई यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी विठुराया त्यांच्या स्वप्नात येऊन काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगितले होते. यानंतर फुलाबाई यांनी आपला मुलगा भारत याला जवळ बोलावून सोने मोडायला सांगितले. तसेच त्यांनी आपले बोकड देखील विकले. यातून आलेले एक लाख वीस हजार घेऊन आजींनी थेट पंढरपूर गाठले आणि विठ्ठल मंदिरात येऊन 1 लाख 11 हजार रुपयांची पावती केली.
अभिनेत्री रवीना टंडनवर आली फरशी पुसायची वेळ; समोर आला धक्कदायक व्हिडीओ
पंढरपूरच्या ( Pandharpur) विठुरायाला रोजच वेगवेगळ्या पद्धतीचे दान येत असते. लोक कोट्यवधी रुपयांचे दान येथे करतात. मात्र फुलाबाई यांनी दिलेल्या या दानाचे महत्व काकणभर सरसच आहे. दरम्यान जवळचे सर्व देवाला वाहून झाल्यावर आजी म्हणतात की, हे पैसे अर्पण केल्यावर डोक्यावरचे ओझे उतरल्यासारखे झाले आहे आणि आता मी डोळे मिटायला मोकळी झाले आहे.