पुणे : आजकाल बरेच तरुण-तरुणी आपला बऱ्यापैकी वेळ सोशल मीडियावर (Social media) घालवतात. पण सोशल मीडियावरील ओळख एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर तरुणीसोबत झालेली ओळख एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. सोशल मीडियातील ओळखीमुळे तरुणाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.
जेवण सुरू करण्याआधी ताटाभोवती पाणी का शिंपडले जाते? वाचा सविस्तर
ही घटना पुण्यामध्ये (Pune) घडली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. या कारणामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तरुणी सारखीच पैशासाठी त्रास देत होती नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देत होती शेवटी कंटाळून तरुणाने आत्महत्या केली.
बापरे! डॉमिनोज पिझ्झ्यामध्ये आढळलेत काचेचे तुकडे; पाहा PHOTO
सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिन्यानापूर्वी या दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. नंतर दोघांमधील संवाद वाढू लागला. तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. शेवटी आत्महत्या करताना तरुणाने तिला एक मेसेज देखील पाठवला, ‘मैं सुसाईड करा रहा हूँ’. त्यावर तरुणी देखील म्हणाली ‘करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हिडिओ व्हायरल कर रही हूँ’, अशी धमकी देत पैशांची मागणी केली. तरुणीच्या याच धमकींमुळे तरुणाने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
मोठी बातमी! पुन्हा एसटी संप होणार? ‘या’ कारणामुळे संतापले कर्मचारी