Mumbai: आज मुंबईत पार पडणार मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक

An important meeting regarding Maratha reservation will be held in Mumbai today

मुंबई : आज संध्याकाळी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत(Maratha reservation) महत्त्वाची बैठक (meeting)पार पडणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

Bharat Gogavle: “आम्ही काय बांगड्या घातल्यात का? शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा विरोधकांना इशारा

छत्रपती संभाजीराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 14 ऑगस्ट 2022 रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) या बैठकीसाठी मुंबईत येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती.

Mumbai: विलेपार्लेत गोविंदाचा दहीहंडीच्या सातव्या थरावरून पडून मृत्यू, आयोजकाला अटक

आजच्या बैठकीसाठी 12 संघटना आणि 50 मराठा समन्वयकांना निमंत्रण देण्यात आले आहे. मराठा मंत्रीमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यावर सोपवण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. या आधी अशोक चव्हाणांकडे हे अध्यक्षपद होतं.गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. सुरूवातील नारायण राणे यांच्या नेतृत्वात हा लढा उभारला गेला. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघताना दिसत असताना आता मराठा समजालाही आरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *