
आपण दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे घडलेल्या दुर्घटना डोळ्यांनी पाहत असतो किंवा ऐकत असतो. दरम्यान अशातच
एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एक फटाका बॉम्ब (Firecracker bomb) गायीच्या (cow) तोंडात फुटल्यानं तिचा जबडाच उद्ध्वस्तच झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान त्यानंतर कानपूरच्या स्थानिक पोलिसांनी (Kanpur Police) सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.
‘तुम्ही गरोदर कधी होणार?’, ‘या’ सरकारने नवविवाहीत महिलांना विचारला आगळाववेगळा प्रश्न; वाचा सविस्तर
या घटनेत कोणीतरी खोडसाळपणाच्या उद्देशानं हे अघोरी कृत्य केलंय? की रस्त्यावर पडलेला फटाका या गायीनं खाल्ला आहे याबाबत तपास सुरू आहे. कानपूर पोलिसांच्या प्राथमिक तपासात अस दिसून येतय की गायीच्या तोंडात फटाका फुटल्यानंच तिच्या जबड्याला दुखापत (Jaw injury) झाली आहे. परंतु गायीचं दुर्दैव म्हणतच की व्हिडिओतील घटनास्थळ स्पष्ट होत नसल्यानं पोलिसांना तपासात अडथळे येत आहे.
उ.प्र.: कानपुर में पटाखा खाने से गाय घायल हो गई।
— ANI_HindiNews (@AHindinews) October 28, 2022
CP बी.पी. जोगदंड ने कहा,"एक गाय के जबड़े में चोट लगने की सूचना मिली थी। पुलिस मौके पर पहुंची और उसे अस्पताल ले गई। गाय ने कूड़े के ढेर में पड़े पटाखे खाए होंगे। मौके की फोरेंसिक और CCTV की जांच की जाएगी। मामला दर्ज़ किया गया है।" pic.twitter.com/O7OegLJFrd
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आल यश, एफआरपीची पहिली उचल 3100 रुपयाने घोषित
दरम्यान या घटनेची सत्यता तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच महापालिकेनं या गायीवर उपचार सुरु केले आहेत. व्हिडिओमध्ये अस दिसतय की, संबंधित गाय ही कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ उभी आहे. त्यामुळे पोलिसांना असाही अंदाज आहे की, या गायीनं कचऱ्यात पडलेलाच एखादा पेटता फटाका खाल्ला असावा. तसेच जर कोणी जाणूनबुझून हा खोडसाळपणा केला असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
‘ट्विटरवर मला पुन्हा घेशील?, ट्विटर अकाउंटवरची बंदी हटवण्यासाठी कंगनाची एलन मास्कला लाडीगोडी