मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडी कडून २ ऑगस्टला अटक करण्यात आली. आता राऊतांच्या अडचणींमध्ये अजून वाढ झाल्याचे चिन्ह दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी केलेल्या छापेमारीमध्ये काही महत्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत. ही कागदपत्रे संजय राऊतांच्या अलिबाग मधील संपत्तीची असल्याची माहिती ईडी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता जास्त चिगळले आहे.
संजय राऊतांची कोठडीत अजून वाढ व्हावी अशी मागणी आज ईडी न्यायालयामध्ये करणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन राऊत यांनी अलिबागमध्ये (Alibag) १० ठिकाणी जमीन खरेदी केली आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, “संजय राऊतांशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणांवर मंगळवारी केलेल्या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रं हाती लागल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे”.
संजय राऊतांच्या अटकेच समर्थन करत संचालनालयाचे सहायक संचालक डी. सी. नाहक यांनी रिमांड म्हणाले की, “पत्राचाळ प्रकल्पात प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना मिळालेल्या ११२ कोटी तूर्तास एक कोटी सहा लाख रुपये संजय राऊत यांना मिळाले हे सकृद्दर्शनी दिसत असले तरी रोख रकमेच्या स्वरूपात राऊत यांना मोठी रक्कम मिळाली आहे”.