ATM Card | बँकेने (Bank) आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचे कोणतेही काम चुटकीसारखी पार पडत आहे. ग्राहकांना पूर्वी बँकेतून पैसे काढायचे असतील त्यांना बँकेच्या लांबच लांब रांगेत कितीतरी तास उभे राहायला लागत असे. ग्राहकांची हीच समस्या लक्षात घेता बँकेने एटीएमची (ATM Card) सुविधा आणली आहे. एटीएममुळे ग्राहकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत नाही. (Bank News)
धक्कादायक घटना! लग्नाच्या पहिल्या रात्री जोडप्यासोबत घडलं भयाण; झाला दुर्दैवी मृत्यू
जर तुमच्याकडे एटीएम असेल तर ते काळजीपूर्वक वापरणे खूप गरजेचे आहे. चुकून तुमचे एटीएम हरवले तर त्याची माहिती लगेचच संबंधित बँकेला देणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. जसे एटीएम वापरण्याचे तोटे आहेत, तसेच त्याचे फायदेदेखील खूप आहेत. (Latest Marathi News)
तुम्ही ते आता पेट्रोल पंप, कोणतेही किराणा दुकान, मॉल यांसारख्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही ते सहज वापरू शकता. जर तुमच्याकडे एटीएम असेल तर त्यावर 16 अंकी क्रमांक असतो. तुम्ही अनेकदा बँकेशी निगडित कोणतेही व्यवहार करत असताना हा क्रमांक वापरला असेल. परंतु अनेकांना हा क्रमांक (ATM Number) काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर जाणून घेऊयात त्याचे उत्तर.
Darshana Pawar । दर्शना पवारचा खून करून राहुल फरारच झाला नाही; तर त्याने…, धक्कादायक माहिती आली समोर
कार्डवर असणारे पहिले 6 अंक हे कार्ड कोणत्या कंपनीकडून जारी करण्यात आले आहेत ते दाखवत असून यालाच ओळख क्रमांक असे म्हटले जाते. सातव्या अंकापासून ते 15 व्या अंकापर्यंतचा क्रमांक बँक खात्याला जोडलेला दुसरा क्रमांक आहे. तसेच कार्डच्या शेवटच्या अंकाला चेकसम अंक असे म्हणतात. यावरून तुमच्या कार्डची वैधता समजली जाते.