महाविद्यालयात विद्यार्थी शिकत असताना अनेक वेगळा रॅगिंग चे प्रकार घडत असतात. काही मुले एखाद्या विद्यार्थ्याला विनाकारण त्रास देतात त्याची रॅगिंग करतात. या घटनांचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. सध्या अशीच एक रॅगिंगची धक्कदायक घटना बुलढाण्यामध्ये (Buldhana ) घडली आहे.
प्रजासत्ताक दिनी हेड कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडत केली आत्महत्या!
रॅगिंगला कंटाळून एका ITI च्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनी हेड कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडत केली आत्महत्या!
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव कैलास गायकवाड असे होते. वस्तीगृहावर विद्यार्थी आपले कपडे काढून रॅगिंग करतात त्याचबरोबर शिक्षकही विनाकारण शिवीगाळ करत असल्याचं कैलासने आपल्या मामाला सांगितलं होतं. सध्या त्याची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. आता या ऑडिओ क्लीपच्या आधारावर पोलिसांनी पाच जणांवर रॅगिंगचे गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…