
मुंबई : शिवसेनेचे दिवंगत ठाणे (Thane)जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Aanand Dighe)यांचा जीवनप्रवास असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmveer movie) हा चित्रपट बॉक्स आफिसवर चांगलाच हिट झाला होता. चित्रपट येऊन बराच काळ उलटला तरीदेखील चित्रपटाचनाव सगळ्यांच्या मुखात आहे. पण आता विशेष म्हणजे आनंद दिघे यांचा जीवनप्रवास आता पुस्तक रूपातून आपल्या समोर येणार आहे.
Anil Deshmukh: जेलमध्ये अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली, जे.जे.रुग्णालयात केलं दाखल
या पुस्तकांचं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ‘एक प्रवास’ आणि ‘अविस्मरणीय पटकथा’ अशा दोन पुस्तकांचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे.आज २६ ऑगस्टला आनंद दिघे यांचा प्रवास आता पुस्तक रूपातून वाचकांच्या भेटीला येणार आहे. तशी घोषणाच अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai)यांनी केली आहे.
Uddhav Thakarey: काय सांगता, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार? वाचा सविस्तर..
या पुस्तकांचं प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी अभिनेता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे देखील उपस्थित राहणार आहेत.तसेच आता धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा देखील निर्मात्यांनी केली होती.