Maharashtra Politics । तटकरेंनी फोडले शरद पवारांचे घर, आव्हाडांच्या आरोपावर अजित पवार गटाचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics

Maharashtra Politics । गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) मोठी फूट पडली. यावर अजूनही शरद पवार गट आणि अजित पवार गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. “सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे कायम अजित पवारांच्या कानात सांगायचे काम करतात. सुनील तटकरे यांनी शरद पवारांचे घर फोडले,” असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी केला आहे. याला अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिले आहे.

Supriya Sule । बारामतीत नागरिकांना धमकावलं जातंय! सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

“अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध करतो. शरद पवारांना आव्हाडांनी विचारावे की, २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यास कोणी सांगितला? शरद पवारांना कायम खोटेनाटे सांगण्याचे काम आव्हाडांनी केले. भिवंडीची जागा हट्टापायी घेतली. आता त्या जागेवर उमेदवार कसा निवडून येईल याची काळजी आव्हाड यांनी करावी,” असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी दिला आहे. (Anand Paranjape vs Jitendra Awad)

Loksabha election । उमेदवाराची हटके प्रचारशैली, गळ्यात चपलांचा हार घालून करतोय दारोदारी प्रचार; कारण जाणून व्हाल चकित

पुढे ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडला,”आरोपही अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे. आनंद परांजपे यांच्या आरोपावर आता जितेंद्र आव्हाड कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Crime News । धक्कादायक! पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीसोबत घडला अतिशय दुर्दैवी प्रकार

Spread the love